मुंबई-हावडा/गुवाहाटी/गोरखपूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरीक्त गर्दी कमी करण्यासाठी उन्हाळ्यासाठी अतिरिक्त आरक्षित विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष
01249 गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 29 एप्रिल रोजी
5.15 वाजता सुटेल आणि गोरखपूरला येथे तिसर्‍या दिवशी 05.05 वाजता पोहोचेल. 01250 विशेष गाडी गोरखपूर 1 मे रोजी 9.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 11 वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा जंक्शन, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत.




लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा विशेष एकमार्गी (वन वे)
01253 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 28 एप्रिल रोजी 10 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी हावडा 11.35 वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर. टाटानगर, खडगपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. .या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, 13 शयनयान, 6 द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गुवाहाटी विशेष एकमार्गी (वन वे)
01255 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 28 एप्रिल रोजी 11.45 वाजता सुटेल आणि गुवाहाटी येथे चौथ्या दिवशी 1.20 वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., पाटलीपुत्र, बरौनी, कटिहार, किशनगंज, न्यू जलपाईगुडी, न्यू कूचबिहार, न्यू बोंगाईगाव, रंगिया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक तृतीय वातानुकूलित, 19 शयनयान बोगी जोडण्यात येतील. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !