पश्‍चिम बंगालमधील भाजपा समर्थकांच्या हत्येचा मुक्ताईनगरात निषेध


मुक्ताईनगर : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्ते तसेच भाजपा समर्थकांच्या हत्येचा तसेच जीवघेण्याचा हल्ला व स्त्रियांवर सामूहिक बलात्काराचे सुरू असल्याचा निंदणीय प्रकाराचा मुक्ताईनगरातील भाजपा पदाधिकार्‍यांनी निषेध केला आहे. या संदर्भात खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत वात मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, जि.प.सभापती जयपाल बोदडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, विनोद पाटील, विजय काठोके, सौरव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !