पश्चिम बंगालातील 28 भाजपा कार्यकर्त्यांचा खूनाच्या निषेधार्थ वरणगांवात भाजपाची निदर्शने


पश्चिम बंगाल राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजपा पदाधिकारी संतप्त

वरणगाव : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयामुळे बेभान झालेल्या तृणमुल काँग्रेस पार्टीच्या गुंडांनी भारतीय जनता पार्टीच्या 28 कार्यकर्त्यांचा निर्घृण खून करण्यात आला तसेच महिलांवर अत्याचार करून बलात्कार केले. अश्या प्रकारची घटना ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेचया निषेधार्थ वरणगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी तृणमुल काँग्रेसच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या तसेच भाजपाच्या 28 कार्यकर्त्यांच्या निर्घृण खून करणार्‍या तृणूमुल काँग्रेसच्या गुन्हेगारांना यावेळी फाशी देण्यात यावी व पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पोलिस प्रशासनाला निवेदन
भाजपा पदाधिकार्‍यांनी यावेळी डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. ए.जी.जंजाळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष प्रणिता पाटील चौधरी, मनोहर सराफ, सरचिटणीस गोलु राणे, कुंदन माळी, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, सरचिटणीस आकाश निमकर, तेजस जैन, शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, गजानन वंजारी, रमेश पालवे, कृष्णा माळी, संदीप माळी, योगेश माळी, मिलिंद भैसे, भाऊलाल टिंटोरे, दीपक चौधरी, मितेश पाचपोळ, राहुल जंजाळे, उपाध्यक्ष पप्पू ठाकरे, दीपक पुंडलिक चौधरी, गोलू वंजारी, जय चांदणे, कमलाकर मराठे, यज्ञेश पाटील, योगेश काळे, संतोष कश्यप, चेतन वंजारी, अल्पसंख्यांक अध्यक्ष डी.के.खाटीक, गजानन वाघ, अनिकेत चांदखेडकर, जयेश कपाटे, गणेश चौधरी यांनी केली.

तर तशास तसे उत्तर : गजानन वंजारी
गजानन वंजारी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या खुनाचा निषेध करून भाजपाच्या नेत्याबद्दल सोशल मीडियावर एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येऊन गलिच्छ टीका टिप्पणी केली जाते त्यावर पोलिस प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा कायदा सुव्यवस्था सुयोग्य राहावी यासाठी दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा जसाच तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा गजानन वंजारी यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला. भाजयुमो शहराध्यक्ष यांनी यावेळी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या कैसालाही धक्का लागल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे यावेळी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !