साकेगावात कोरोना योद्धा कामगारांचा सत्कार
साकेगाव : कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायत कर्मचारी कोरोना योद्धांचा सत्कार व ग्रामपंचायतीतर्फे 11 हजार रुपये व आमदार संजय सावकारे यांच्यातर्फे 11 हजार रुपये व सरपंच आनंद ठाकरे यांच्यातर्फे दोन हजार असे एकूण 24 हजारांचे बक्षीस आमदार सावकारे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाला देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने उत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्याला अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस घोषित केले होते त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. सर्व कर्मचारी वर्गाने उत्कृष्ट कार्य केल्यामुळे सर्वांना एकत्र अकरा हजार रुपयाचे बक्षीस घोषित करण्यात आले. बक्षीस प्रदान करताना आमदार संजय सावकारे यांनी कर्मचारी 24 व बक्षीस 11 हजारांचे असे बोलून माझ्या खिशात जितके पैसे असतील तितकी देणगी मात्र त्यांच्या खिशात 11 हजार रुपये निघाले एकूण 22 हजारांची रक्कम झाली व झाले सरपंच आनंद ठाकरे यांनी दोन हजार रुपये जमा करीत एकूण 24 हजार रुपये पूर्ण केले प्रसंगी सर्व कर्मचारी वर्गाला 24 हजार रुपयाचे बक्षीस व एक भेटवस्तू ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्या आली.
यांची होती उपस्थिती
प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, माजी सरपंच अनिल पाटील, संजय पाटील, माणिक पाटील, सुभाष कोळी, डॉ.बाबासाहेब पाटील, सरपंच पती विष्णू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे, कुंदन कोळी, गजानन पवार, हिंमत सोनवणे, अरुण कोळी, सचिन राजपूत, सागर सोनवाल, अजय चौधरी, संतोष पाटील, विलास ठोके, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार सह सर्व कर्मचारीबांधव व मान्यवरांची उपस्थिती होती.



