प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा


कमलाकर माळी यांनी माणुसकी समूहातर्फे केले आव्हान

वाघोदा :  कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. कोरोना आजारावर प्लाझ्मा थेरपीद्वारे रुग्णांवर उपचार करून त्यांना आधार दिला जात आहे त्यामुळे आपल्या कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्याकरिता पुढे येऊन प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन तरुण समाजसेवक कमलाकर माळी केले आहे.

प्लाझ्मा थेरपी रुग्णांना अनेक वरदान
कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही अनेक रुग्णांना वरदान ठरत आहे. त्याच्या थेरीपीतून कोरोनातून बरा झालेल्या रुग्णांचा रक्तातून काढलेल्या प्लाझ्मातील कोविळ विरोधक अँटीबॉडी दुसर्‍या रुग्णाला दिल्या जातात त्यामुळे रुग्णांना या आजारातून बाहेर काढणे काही प्रमाणात का होईना शक्य आहे मात्र प्लाज्मा दान करण्यासाठी कोरोणातून पूर्णतः बरे झालेले रुग्ण समोर येत नसल्यामुळे गंभीर रुग्णांवर याद्वारे उपचार करणे वैद्यकीय अधिकार्‍यांना प्रश्न पडत असतो. एक प्लाज्मा दानातून दोन रुग्ण बरे होऊ शकतात त्यामुळे अधिकाधिक प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. रेड प्लस ब्लड बँकेत काही कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांनी समोर येऊन प्लाझ्मा दान केलेला आहे त्यामध्ये माणुसकी रुग्णसेवा समूह वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून प्लाझ्मा डोनर शोधत आहेत. राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने ही तयारी सुरू केली आहे. रुग्ण कोरोना बाधीत झाल्यानंतर 28 दिवस ते चार महिन्यांच्या कालावधीत कोरोनाबाधीत रुग्ण बरा होऊन प्लाझ्मा दान करून इतर दोन व्यक्तींचे जीवन वाचवू शकतो त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करून आपले कर्तव्य बजावून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवावे, असे आवाहन माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे कमलाकर माळी समाजसेवक यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !