पाडळसा व न्हावीत वॉशआऊट : 80 हजारांचे रसायन नष्ट
फैजपूर : अवैध गावठी दारूविरुद्ध धडक मोहिम राबवत फैजपूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत सुमारे 80 हजारांचे रसायन नष्ट केले. पाडळसा येथे 31 हजार 500 रुपयांचे तर न्हावी येथे एक हजार 50 रुपयांचे हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात येून हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त कण्यात आले. रवींद्र उर्फ चिनी महाराज भास्कर कोळी (रा.पाडळसा) व न्हावी येथील पंकज चिंतामण तायडे या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, किरण चाटे, देविदास सुरदास, विकास सोनवणे, महेश वंजारी व उमेश सानप यांच्या पथकाने केली.




