संतापजनक : भूतबाधा काढण्याचे बहाण्याने विवाहितेवर अत्याचार
अहमदनगर : चक्कर येणे, अशक्तपणा त्रास जाणवत असलेल्या महिलेवर भूतबाधा झाल्याने ती काढण्याच्या निमित्ताने मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना संतापजनक घटना संगमनेर तालुक्यात घडली. पीडितेने सोमवारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मांत्रिक सावित्रा बाबूराव गडाख (वय 55, रा. पारेगाव, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली. पीडित महिला ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी आहे.
मद्य पाजत केला अत्याचार
त्रासापासून सुटका होण्यासाठी पीडीता पतीसह मांत्रिकाकडे गेल्या होत्या. 23 एप्रिल रोजी मांत्रिकाच्या वस्तीवर पठारावरील पोल्ट्री फार्मवर मध्यरात्री एक वाजता मांत्रिकाने या महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध मद्य पाजले व नंतर अत्याचार केला.





