पत्नीच्या खुनानंतर पसार झालेला पती 11 वर्षानंतर जाळ्यात


पंचवटी : पत्नीचा चारीत्र्याचा संशय घेत तिचा खून केल्यानंतर पसार झालेल्या आरोपी पतीच्या तब्बल 11 वर्षांनी मुसक्या आवळल्या पंचवटी पोलिसांना यश आले. काशीनाथ बाळू पवार (60) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सय्यद पिंपरी रस्त्यावरील आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणार्‍या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाल्यानंतर आरोपीने पवारे त्याची पत्नी गुणीबाई पवार (45) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्या मारून तिचा खून केला होता. 11 ऑगस्ट 2010 रोजी ही घटना घडली होती. आरोपी दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथे एका शेतात असल्याची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !