संतापजनक ! : पुर्नविवाहानंतर पंचांची महिलेला थुंकी चाटायची शिक्षा


मुंबई : पतीशी घटस्फोट झाल्यानंतर महिलेने पुर्नविवाह केल्यानंतर ही बाब जात पंचायतीला ही बाब मान्य नसल्याने तिला थुंकी चाटायची शिक्षा व एक लाख रुपयांचा दंड सुनावल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी
अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील वडगाव या गावात ही धक्कादायक घटना घडली असून पीडीत महिलेने 2011 मध्ये विवाह केल्यानंतर पतीकडून होणार्‍या जाचानंतर तिने सन 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडितेने न्यायालयात नाथजोगी जात पंचायतीच्या पंचांना रूचले नाही. त्यानंतर 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केल्याने जात पंचायतने तिला एक लाख रुपयांचा दंड सुनावला व त्या परीवारास जात बहिष्कृत करीत पीडित महिलेने पहिल्या नवर्‍यासोबत रहावे व केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे, अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडवले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !