खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयास कॉम्प्युटर भेट


अनावश्यक खर्च टाळत रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांनी निर्माण केला आदर्श

भुसावळ : रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर, जाहिरात व इतर अनावश्यक खर्च टाळत समाजभान ठेवून ग्रामीण रुग्णालयाला रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत सुधीर पाटील यांनी गुरुवारी अत्याधुनिक प्रणालीचे कॉम्प्युटर भेट दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांच्या मागणीनुसार कोरोना काळात काम सुलभ होण्याच्या उद्देशाने ही भेट देण्यात आली. कोरोनाच्या कठीण काळात शासकीय यंत्रणा सक्षम होण्यासाठी त्यामुळे मोठी मदत होणार असून अनिकेत पाटील यांच्या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हे देखील वाचा : लोकप्रिय खासदार रक्षा खडसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

अनिकेत पाटील सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर
कोरोनाच्या कठीण काळात अनिकेत पाटील व त्यांचे सहकारी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत शिवाय आपणही समाजाचं देणं लागतो या सेवाभावी वृत्तीतून आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत शिवाय यापुढेही हा वसा निरंतर कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध स्तरातील व्यक्तींना मदतीचा हात त्यांनी नेहमीच पुढे केला आहे. आपणही समाजाचे नक्कीच काहीतरी देणे लागतो व आपण समाजाच्या कामी आलो पाहिजे या भावनेतून हे कार्य केले व समाजात नवा आदर्श निर्माण केला, असे याप्रसंगी अनिकेत पाटील म्हणाले.

यांची होती उपस्थिती
याप्रयंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेवक सुनील नेवे, नगरसेवक मुकेश पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद पाटील, राजकुमार खरात, संदेश सुरवाडे प्रशांत नरवाडे, देवा वाणी, सुमित बर्‍हाटे, दिनेश नेमाडे, सागर वाघोदे, पृथ्वीराज पाटील, सागर साळी, कार्यकर्ते, पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !