विवाहितेची अश्लील छायाचित्रे सोशल मिडीयावर टाकली : आरोपीला अटक
औरंगाबाद : विवाहितेचा विनयभंग करीत तिची अश्लील छायाचित्रे सोशल मिडीयावर टाकल्याप्रकरणी अक्षय वानखेडे (महालक्ष्मी चौक, सिडको एन-2), या आरोपीला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी आणि आरोपी यांची 2018 पासून ओळख असताना त्यांनी छायाचित्र काढले व तक्रारदाराचे लग्न झाल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर अपलोड केली. पतीला ही बाब कळताच त्यांनी पत्नीला माहेरी आणून सोडले तर पीडीतेन या त्रासाला कंटाळून आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवताच त्यास अटक करण्यात आली.