बाबूराव आपटे अभी जिंदा है रे….!
मुंबई : हेरा फेरी चित्रपटातील कॉमेडी अभियनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या निधनाच्या अफवांचे पेव शुक्रवारी फुटल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला मात्र पोस्ट अफवा असल्याचे सिद्ध झाले तर परेश रावल यांनाही या बाबीचा आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा स्किनशॉर्ट शेअर परेश रावल यांनी शेअर करीत ‘गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सकाळी 7 वाजता मी झोपलेलो होतो,’ असे मजेदार ट्विट त्यांनी केले. ते म्हणाले की, अशा अफवा कोण पसरवतो, मला माहित नाही़ माझ्या निधनाची बातमी खोटी आहे. अशा अफवांची मी निंदा करतो, असेही ते म्हणाले.