लाचखोर पोलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराला एसीबीच्या जाळ्यात


नागपूर : दहा हजारांची लाच मागणे पोलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराच्या अंगलट आले असून लाच स्वीकारताच एसीबीकाने दोघांना रंगेहाटथ अटक केली. भारत रमेश थिटे (30) असे अटकेतील पोलिस उपनिरीक्षक व अमित शंकर पवार (28) असे पोलीस अंमलदाराचे नाव आहे. लाचखोर अंमलदार व उपनिरीक्षक कुही पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणातील तक्रारदार हा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्यास पोलिस कोठडीत न ठेवता तपासात मदत करण्यासाठी 10 हजार रुपयांची आरोपींनी मागितली होती. चोरीच्या प्रकरणाचा थिटे यांच्याकडे तपास होता शिवाय आरोपीची पोलिस कोठडी न घेता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत व्हावी यासाठी व पुढील तपासातसुद्धा त्याला मदत करण्याच्या मोबदल्यात थिटेने या तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांची मागणी केली. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता झाली. त्याने या प्रकाराची तक्रार ए.सी.बी.कडे केली. पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात आणि त्यांच्या चमूने सापळा रचला. यात पवार हा तक्रादाराकडून थिटे यांच्यासाठी पैसे घेताना रंगेहाथ सापडताच दोघांना अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !