बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने प्रेयसीची हत्या


मुंबई : हातात पूर्ण पगार न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी प्रेयसी सातत्याने देत असल्याने प्रियकराने प्रेयसीची चाकूचे वार करीत हत्या केली. बीकेसी पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत आरोपी मोहम्मद जलील कलीम शेख यास अटक केली. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत पे्रयस आरोपीकडे पूर्ण पगार हाती देण्यासाठी धमकावत होती शिवाय या धमकीला कंटाळून आरोपीने तिला फिरण्यासाठी बीकेसी परीसरात नेत तिच्या गळ्यावर वार करत हत्या केली. त्यानंतर जवळील नाल्यात मृतदेह फेकला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !