ई संस्कार वाटीकेचा शुभारंभ : 44 देशातून अडीच लाख मुलांचा सहभाग
भुसावळ : गीता परीवार दक्षिणांचल अखिल भारतीय माहेश्वरी महिला संगठनच्य बाल व किशोरी विकास समिती विप्र फौंडेशन महिला प्रकोष्ठ तथा वन बंधू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 30 मे पर्यंत मुलांसाठी सर्वांगीण विकास तसेच संस्कार ज्ञान महायज्ञ आरंभ करण्यात आला आहे.
44 देशांमधील अडीच लाख मुले सहभागी
दक्षिणांचल अखिल भारतीय महेश्वरी महिला संघटनच्या प्रमुख कॉर्डिनेटर डॉ.संगीता मनोज बियाणी म्हणाल्या की, गीता परीवाराद्वारा आयोजित ह्या कार्यक्रमात 44 देशांमधील अडीच लाख मुलांनी सहभाग घेतला आहे. हा उपक्रम 5 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलीसाठी आहे. एक हजार व्हाट्सअॅप ग्रुपने ह्या सर्व सहभागी मुलांना लिंक पाठवली जात. ह्या लिंक च्या माध्यमातून विद्यार्थी ह्या उपक्रमामध्ये सहभागी झाले. लॉक डाऊनच्या ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ज्ञानवर्धक, मनोरंजनात्मक, योगासने प्रार्थना, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, आर्ट, क्राफ्ट वर्क इत्यादी गोष्टी घर बसल्या मोबाईल च्या माध्यमातून शिकतील तसेच दररोज मुलांना एक प्रश्नोत्तरी दिली जाईल त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पारीतोषिक तसेच प्रमाणपत्र सुद्धा दिले जाईल. हा कार्यक्रम खरोखरच एक अद्वितीय व अद्भुत असा कार्यक्रम
आहे.



यशस्वीतेसाठी यांचा सक्रिय सहभाग
डॉ.संगीता मनोज बियाणी यांनी या उपक्रमामध्ये जास्तीत-जास्त संख्येने मुलांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाच्या प्रचार-प्रसार व यशस्वीतेसाठी दक्षिणांचल सहा प्रभारी डॉ.संगीता मनोज बियाणी तसेच दक्षिणांचल सहयोगी संगीता मनिया (पुणे), संतोष सोमानी (कर्नाटक), हेमा माहेश्वरी (आंध्रप्रदेश), सुमन कोठारी (मुंबई), प्रियंका मुंदडा (तामिळनाडू), यांचा सक्रिय सहभाग आहे. या सर्वांना राष्ट्रीय प्रभारी निर्मला मारू तसेच दक्षिणांचलच्या सर्व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या.

