50 लाखांची लूट करणारा चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


घर का भेदी लंका ढाये : राजस्थानात जाण्यापूर्वी आवळल्या मुसक्या : 38 लाखांची रोकड जप्त

जळगाव : तामिळनाडू राज्यात कामाला असलेल्या नोकरांनी मालकाकडे 50 लाखांची चोरी करून रेल्वेद्वारे राजस्थानकडे प्रवास सुरू केला असताच गुन्हे शाखेने दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून 38 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मंगलराम आसुराम बिस्नोई (19, रा.खडाली, ता.गुडामालाणी जि.बडमेर, राजस्थान) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर सोबत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. संशयीतांना घेण्यासाठी तामिळनाडू पोलीस पथक जळगावकडे रवाना झाले आहे.

नवजीवन एक्स्प्रेसमधून आरोपींना अटक
मोहनकुमार जगाथागी, दवनयागम सोवा पेट सेलम (तामिळनाडू) यांच्याकडे त्यांच्याकडे कामाला असलेल्या दोघा नोकरांनी 19 मे सायंकाळी 7 ते 20 मे सायंकाळी 7.30 दरम्यान घरात जबरी चोरी करून 50 लाख रूपयांची रोकड लांबली होती. याप्रकरणी मोहनकुमार जागाथानी यांच्या फिर्यादीवरून तामिळनाडूतील सेलम पोलिस ठाण्यात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. दोन्ही आरोपी राजस्थान येथील असल्यामुळे चोरीतील रोकड घेवून राजस्थान येथे जात असल्याची दाट शक्यता असल्याने सेलम पोलिस अधीक्षकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. संशयित दोन्ही आरोपी हे चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमधून जाण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचाना देवून संशयित आरोपीसह मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्यात. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने शुक्रवारी मलकापूर ते जळगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसच तपासणी केली. त्यात संशयित आरोपी मंगलराम आसुराम बिस्नोई (वय-19) रा. खडाली ता. गुडामालाणी जि.बडमेर (राजस्थान) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल.े दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 37 लाख 97 हजार 780 रूपये हस्तगत करण्यात आले.





यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनील दामोदरे, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, मुरलीधर बारी आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !