कोरोना टेस्ट करताना स्टीक तुटली : नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण


मुंबई : महिलेची कोरोना टेस्ट करताना टेस्टसाठी लागणारी टेस्टींग स्टीक नाकात तुटल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना विरार पूर्वमधील बालाजी रुग्णालयात घडली. विरार पोलिस ठाण्यात नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्वेला असलेल्या बालाजी हॉस्पिटल आहे. शनिवारी एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. चाचणी करताना या रुग्णाच्या नाकात आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणारी स्टिक तुटल्याचे समजले. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांला पकडून मारहाण करण्यात आली. ही सर्व घटना मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे शुटिंग नातेवाईकांनीच केलं असल्याचं व्हिडीओतून येणार्‍या आवाजावरून कळत आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात डॉक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !