तळवेलच्या तिघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू


वरणगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने तिघा मित्रांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावरील फुलगावाच्या उड्डान पुलाजवळ मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे. विवेक सुनील पाटील (16), श्याम राजेंद्र पाटील व (16), देवानंद सोपान पाटील (17, तिघे रा.तळवेल, ता.भुसावळ) अशी मयतांची नावे आहे. कुटुंबातील एकुलत्या एक मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने तळवेल गावावर शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार
भुसावळकडून तळवेल गावाकडे तिघे मित्र दुचाकी (एम.एच.19 यु .7863) ने येत असताना राष्ट्रीय महामार्गाच्या फुलगाव जवळील नवीन उड्डान पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकला जबर धडक दिल्याने विवेक सुनील पाटील (16) याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर श्याम राजेंद्र पाटील (16) व देवानंद सोपान पाटील (17) या अत्यवस्थ अवस्थेत गोदावारी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाही त्यांचीही प्राणज्योत मालवली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !