सीबीआयच्या प्रमुखपदी सुबोध कुमार जयस्वाल
नवी दिल्ली : राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आता सीबीआयचे नवे प्रमुख असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुबोध कुमार जयस्वाल यांची मंगळवारी दोन वर्षांसाठी निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन.व्ही.रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत.
1985 बॅचचे अधिकारी
जयस्वाल हे महाराष्ट्र केडरचे 1985 बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते सीआयएसएफचे संचालक म्हणून नियुक्त होते. ऋषी कुमार शुक्ला यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने फेब्रुवारी महिन्यापासून सीबीआयचे संचालकपद रीक्त होते. अतिरीक्त संचालक प्रवीण सिन्हांकडे याचा पदभार होता.



