तत्कालीन अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकरांच्या नावाने अज्ञाताने बनवले फेसबुक खाते
50 हजारांचा गंडा घातल्यानंतर खाते तत्काळ झाले बंद : सतर्कता बाळगण्याचे आवाहन
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील अपर आयुक्त व जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाचे फेसबुकवर बनावट खाते बनवून पैशांची मागणी केल्यानंतर डॉ.सुपेकरांच्या मित्राने 50 हजार पाठवले मात्र हे खाते बनावट असल्याची बाब उघड झाल्यानंतर खाते तत्काळ बंद करण्यात आले व नागरीकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन डॉ.सुपेकर यांनी केले आहे.
आधी केले तयार ; नंतर पैशांची मागणी
तत्कालीन अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या नावाने भामट्याने फेसबुक खाते तयार करीत त्यांच्या मित्रांना फ्रेंड रीक्वेस्ट पाठवत ती स्वीकारताच पैशांची मागणी केली. पुण्यातील व्यापारी असलेल्या मित्राने 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. डॉ.सुपेकर यांच्या नावाने बनावट खाते तयार झाल्याचे माहिती काही मित्रांच्या लक्षात आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार सुपेकरांना कळवताच त्यांनी शिवाजी नगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून हे खाते ब्लॉक केले. हे खाते फेक असून कोणीही यावर पैशाचा व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले. त्यांचा हा मेसेज बघितल्यानंतर ज्या मित्राने पैसे पाठवले त्याने डॉ.सुपेकरांशी संपर्क साधून पैसे पाठवल्याचे सांगताच तातडीने सूत्र हलविल्यानंतर नऊ हजार रुपये थांबवण्यात यश आले,अन्यथा ही रक्कमही सायबर गुन्हेगाराच्या हातात गेली असती.





