उल्हासनगरात पाच मजली ईमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू


उल्हासनगर : पाच मजली ईमारतीचा स्लॅब अचानक तळ मजल्यावरून कोसळल्याने दबले जावून सात जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती कळताच महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली तर पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटवत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. ईमारतीमधील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था थारासिंग दरबार येथे करण्यात आली. इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शोधकार्य सुरू आहे तर जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.







सात जणांचा मृत्यू
स्लॅब कोसळल्याने पुनीत बजोमल चांदवाणी (17), दिनेश बजोमल चांदवाणी (40), दीपक बजोमल चांदवाणी (42), मोहिनी बजोमल चांदवाणी (65), कृष्णा इनूचंद बजाज (24), अमृता इनूचंद बजाज (54), लवली बजाज यांचा मृत्यू झाला.

अचानक कोसळला स्लॅब
कॅम्प 2 मधील साई शक्ती इमारतीत ही दुर्घटना घडली असून पाच मजली ईमारतीतील पाचव्या मजल्यापासून खालच्या मजल्याचा स्लॅब तळ मजल्यावर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह उपस्थित आहेत. सुरुवातीला 5 व्यक्तींचे मृतदेह सापडले होते व नंतर दोन मृतदेह आढळले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !