गुंडांनी वीटांनी ठेचून तरुणाची केली हत्या


नागपूर : मोमीनपुर्‍या नजीकच्या योगा कंपनी जवळील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय तरुणाची गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विटांनी ठेचून हत्या केली. शुक्रवारी रात्री पाचपावलीतील लष्करीबाग परीसरात ही घटना घडली. कपिल शशिकांत बेन (20) असे मयताचे नाव आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येत जमल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. पाचपावलीचा पोलिस ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी तसेच गुन्हे शाखेची पथके, दंगा प्रतिबंधक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खुनाचे स्पष्ट कारण व आरोपींची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !