केळी पट्ट्यातील नुकसानीची मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार पाहणी
रावेर/मुक्ताईनगर : अवकाळी झालेल्या वादळी वार्यासह पावसाने केळी उत्पादकांच्या हाता-तोंडाशी घास हिरावला तर मुक्ताईनगरसह रावेर तालुक्यात अनेक घरांचे पत्रे उडून ग्रामस्थ उघड्यावर आल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार, 1 जून रोजी जिल्हा दौर्यावर येत आहेत. या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी माहिती दिली आहे.
विरोधी पक्ष नेत्यांसोबत यांचीदेखील राहणार उपस्थिती
या दौर्यत माजी पालकमंत्री गिरीष महाजन, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद अध्यक्ष रंजना पाटील, किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके व नंदूभाऊ महाजन व या भागातील लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी हे सोबत असतील.


