नऊ लाखांची लाच मागणार्या मुख्याधिकार्यास अटक
पुणे : तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे नगरपरीषदेच्या मिळालेली कामे पूर्ण केल्यानंतर चार कामाची बिलांची रक्कम काढण्यासाठी नऊ लाखांची लाच मागणार्या तळेगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी शाम लक्ष्मणराव पोशेट्टी (44, रा.खारघर, नवी मुंबई) व उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड (33, रा.अथेना सोसायटी, तळेगाव दाभाडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयीतांना ट्रॅप आल्याची कल्पना आल्याने पथक तब्बल चार वेळा गेल्यानंतर त्यांनी लाच न स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅपचा संशय आल्याने स्वीकारली नाही लाच
तक्रारदाराचे बिले काढण्यासाठी उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मिंड याने मुख्याधिकारी शाम पोशेट्टी यांच्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर 6 व 7 मे व 17, 20 व 21 मे रोजी सापळा रचण्यात आला मात्र आरोपींना ट्रॅप आल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच न स्वीकारल्याने अखेर सोमवार, 31 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याधिकारी शाम पोशेट्टी याला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.






यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती पाटील व सहकार्यांनी यशस्वी केला.