माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांनी कोविड उपाययोजनांची केली पाहणी


मुक्ताईनगर : जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी डॉक्टर्स व अन्य कर्मचार्‍यांसह काही रूग्णांशी संवाद देखील साधला. याप्रसंगी त्यांच्या सोबत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, उपजिल्हा रूग्णालयात पाहणी केली. या हॉस्पीटलमध्ये कोविडच्या प्रतिकारासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून याबाबत फडणवीस यांनी माहिती जाणून घेतली.

हे देखील वाचा : केळी पीक विम्यातील निकष बदलाचा संताप : मुक्ताईनगरात फडणवीसांचा ताफा अडवला


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !