विरोधी पक्षनेते फडणवीस मुक्ताईनगरात तर नाथाभाऊ मुंबईत


मुक्ताईनगर : केळी पट्ट्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौर्‍यावर आले असून मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सकाळी 11 वाजता सदिच्छा भेट दिली मात्र माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे सोमवारीच मुंबईत गेल्याने उभयंतांची भेट टळली असलीतरी विरोधी पक्ष नेत्यांनी खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीनंतर राजकीय गोटात विविधांगी चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, फडवणीस यांचे आगमन झाल्यानंतर भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे 20 मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते.

भेट टाळण्यासाठी खडसे मुंबईत
खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर त्यांनी फडवणीसांवर टिकेचे बाण चालवले होते त्यामुळे मुक्ताईनगर दौर्‍यावर फडवणीस आले असलेतरी खडसे मात्र मुंबईत सोमवारपासून असल्याने उभयंतांची भेट टळली मात्र भेट टळण्यासाठीच खडसे मुंबईत दाखल झाले तर नाही ना? अशी देखील चर्चादेखील आहे. खडसेंच्या बालेकिल्ल्यात फडवणीस यांनी दिलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातदेखील याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !