वरणगाव पाणीपुरवठा योजना कामाला गतीसाठी प्रधान सचिवांना सूचना देणार


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस : वरणगाववर माझे विशेष लक्ष, काळजी नसल्याचा माजी नगराध्यक्ष सुनील काळेंना दिला शब्द

वरणगाव : जिल्हा दौर्‍यावर आलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नव्या मुक्ताबाई मंदिरावर वरणगावातील भाजपा पदाधिकार्‍यांनी दुचाकी रॅली काढून स्वागत केले. तनिष्क मिलिंद भैसे याने हाताने बनविलेलर गौतम बुद्धांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची स्केचची प्रतिमा भेट देण्यात आली. दरम्यान, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी स्वागतप्रसंगी वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेला अद्याप गती मिळाली नसल्याचे सांगितल्यानंतर फडवणीस यांनी योजनेचे काम जलद गतीने होण्यासाठी प्रधान सचिव यांना कडक सूचना देवून कार्यवाही करायला सांगतो, असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे, ज्येष्ठ नेते दत्तूपंत मराठे, शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलू राणे, आकाश निमकर, उपाध्यक्ष हितेश चौधरी, शामराव धनगर, सुभाष धनगर, रमेश पालवे, गोलू वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, राहुल जंजाळे, शंकर पवार, कृष्णा माळी, संदीप माळी, नामदेव मोरे, मिलिंद भैसे, तनिष्क भैसे, कमलाकर मराठे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणिता पाटील, पप्पू ठाकरे, जयेश कपाटे, शांताराम माळी, गजानन वंजारी, योगेश माळी, डॉ.प्रवीण चांदणे, लखन माळी, रॉक कश्यप, कुंदन माळी, तेजस जैन, विक्की चांदेलकर, नरेंद्र बावणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !