60 हजारांची लाच भोवली ; हवालदार एसीबीच्या जाळ्यात
औरंगाबाद : तडजोडीअंती 60 हजारांची लाच घेणे हवालदाराच्या अंगलट आले असून एसीबीने लाच स्वीकारताच त्यास अटक केली. गणेश ज्ञानेश्वर अंतरप असे अटकेतील हवालदाराचे नाव असून मंगळवारी सकाळी कारवाई एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच सापळा यशस्वी झाचल्याने खळबळ उडाली.पोलीस ठाण्याला प्राप्त अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दिड लाखांची लाच मागून नंतर 60 हजारांची रक्कम ठरली होती.
कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
एमआयडीसी वाळूज परीसरातील एका कंपनीने तक्रारदार गांजा विक्री करीत असल्याचा अर्ज दिल्यानंतर तो अर्ज हवालदार अंतरप यांच्याकडे होता. त्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी दिड लाख रुपये लाच मागितली मात्र 60 हजारात तडजोड झाली. पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नंदकिशोर क्षीरसागर आणि कर्मचार्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. मंगळवारी सकाळी 10 वाजता हवालदार अंतरप यानी तक्रारदाराकडुन लाच घेताच एसीबीच्या अधिकार्यांनी त्यास पकडण्यात आले.





