अमळनेर शिवारात 30 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेह जाळला


अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा : अनोळखी अर्धवट अवस्थेतील जळालेल्या मृतदेहाबाबत माहिती देणार्‍यास मिळणार बक्षीस ; पोलिस नावही ठेवणार गुप्त

अमळनेर : अनोळखी इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह अमळनेर-टाकरखेडा रस्त्यावरील शेत-शिवारात आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर पोलिसात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे तसेच मारेकर्‍यांची माहिती आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून बक्षीसही दिले जाणार आहे.

खून करून जाळला मृतदेह
अमळनेर शेत शिवारातील फॉरेस्ट कम्पार्टमेंटमधील काटेरी झुडूपात 31 मे च्या सकाळी 10 ते 2 जूनच्या सकाळी 10 वाजेदरम्यान एका 30 वर्षीय अनोळखी तरुणाची हत्या केलेला मृतदेह जाळण्यात आला आहे. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला असून खुनाचा तपासाला वेग दिला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहा.निरीक्षक राकेश परदेशी, उपनिरीक्षक राहुल लबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.







अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
मयताच्या अंगावर काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, लाल रंगाची अंडरवेअर, उजव्या हातावर ऊ.दि.क.श.आ.वि.असे गोंदलेले आहे. ओळख पटल्यास किंवा मारेकर्‍यांची माहिती दिल्यास योग्य ते बक्षीस दिले जाईस, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. यासाठी अमळनेर पोलीस ठाण्याशी (02587-222333) व पोलिस निरीक्षक जयपाल हिरे (88888-97686) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !