मोठी बातमी : राज्यात बारावी बोर्डाची परीक्षा रद्द होणार
मुंबई : राज्यातील बारावी बोर्डाची परीक्षा रद्द हरेणार असून त्या संदर्भात बुधवारी मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली असून एकमतही झाले आहे. या संदर्भात .लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे यंदाची बारावी सीबीएसईची परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातही तसा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंडळाचे शिक्कामोर्तब झाल्यावर निर्णय उच्च न्यायालयाला कळवण्यात येणार आहे.