भुसावळात पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान


भुसावळ : कोरोनाच्या कठीण काळात जनसेवेसाठी सेवा देणार्‍या कोरोना लसीकरण अभियानात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आरोग्य सेवकांचा महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या 55 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील खळवाडी भागातील महात्मा फुले आरोग्य केंद्रात कोरोना नियमांचे पालन करून शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !