शेतात वीज कोसळून तिघा मजुरांचा करुण अंत


भंडारा : मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरूवात होताच मजूर झाडाच्या आश्रयाला थांबताच वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मोहाडी तालुक्यातील खमारी बूज येथे मंगळवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. आशा संपत दमाहे (42), अनिता फत्तू सव्वालाखे (40), अशोक किरतलाल उपराळे (46, तिघेही, रा. खमारी बूज) अशी मृतांची तर रतिलाल किरतलाल उपराळे (55), त्यांची मुलगी पल्लवी रतिलाल उपराळे (20) अशी जखमींची नावे आहेत. गावातील रतिलाल उपराळे यांच्या शेतात मंगळवारी हे सर्व कामासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !