सुखद दिलासा : जळगाव महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू


जळगाव : जळगाव महापालिकेतील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांसह सुखद बातमी आहे. महापालिकेतील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने पगारात घसघशीत वाढ होणार आहे. त्या संदर्भातील आदेश नगरविकास विभागाचे उप सचिव शंकर जाधव यांनी काढले आहेत. दरम्यान, थकीत फरक हा पाच टप्प्यात मिळणार आहे. महापालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळण्यासाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे पाठपुरावा करण्यात आला होता तर आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर भारती सोनवणे, विद्यमान महापौर जयश्री महाजन यांनी सकारात्मक भूमिका घेवून शासनाकडे पाठपुरावा केला.

मनपा कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लहर
सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे मनपा कर्मचार्‍यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन 1 जानेवारी 2021 पासून देण्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेने आर्थिकस्थिती विचारात घेवून 2016 ते 2020 या कालावधीतील थकीत फरक पाच टप्प्यात देण्याची दक्षता घेण्याबाबतचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.







 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !