महापालिकेचा लाचखोर वरीष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात
नागपूर : महापालिकेत सेवानिवृत्त सफाई कर्मचार्यास निवृत्ती वेतनासह इतर हक्काचे मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्या महापालिकेतील वरीष्ठ लिपिक राजेंद्र शंकरराव गजभिये (55) यास एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केली.
सेवानिवृत्त कर्मचार्याच्या पत्नीने नोंदवली तक्रार
महापालिकेतील सफाई कर्मचारी 31 मार्च रोजी सेवानिवृत्त मात्र त्यांनी ते अंथरूणाला खिळल्याने त्यांच्या पत्नीने निवृत्तीवेतन आणि ईतर हक्काचे लाभ मिळावे म्हणून धरमपेठ झोन 2 च्या आरोग्य विभागात चकरा मारल्या असता निवृत्ती वेतनासोबतच शिल्लक सुट्यांचे पैसे वाढवून देण्याचे सांगत आरोपी गजभियेने महिलेकडे 3 जून रोजी 10 हजारांची मागणी केली. पीडीत महिलेला लाच द्यावयाची त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी चार वाजता आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. गजभियेविरुद्ध अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





