मध्य रेल्वेची महिनाभरात 6.32 दशलक्ष टन माल वाहतूक


वर्षभरात माल वाहतुकीचा वेग दुप्पट ; बीडीयू युनिटच्या प्रयत्नांना यश

भुसावळ : सध्या देशभरात असलेल्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन महिन्यात रेल्वेत प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली होती. अशा परीस्थितीत अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या मात्र मालवाहूक सेवा सुरळीतपणे चालू असल्याने एप्रिल ते मे दरम्यान 2021 मध्ये 12.57 दशलक्ष टन मालवाहतूक लोडिंग झाली. एप्रिल ते मे 2020 दरम्यान झालेल्या 7.55 दशलक्ष टन लोडिंगपेक्षा ती 66.5 टक्के जास्त आहे. रेल्वेच्या व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच देशात कोरोनाचे संकट असूनही मध्य रेल्वेने मे 2021 या महिन्यात मालवाहतूक लोडिंगमध्ये भर पाडली आहे. मे 2021 मध्ये मध्य रेल्वेने 6.32 दशलक्ष टन वाहतूक केली. ती मे 2020 मधील 4.33 दशलक्ष टन च्या तुलनेत 45.9 जास्त आहे.

कोळसा, लोखंडासह खतांची वाहतूक
मे 2021 मध्ये 3.57 दशलक्ष टन कोळसा, 0.21 दशलक्ष टन लोह व स्टील, 0.58 दशलक्ष टन सिमेंट, 0.86 दशलक्ष टन कंटेनर आणि 1.10 दशलक्ष टन खत, पीओएल इत्यादींचा समावेश असलेले इतर मालवाहतूक लोडिंग केली आहे. एप्रिल ते मे 2021 या काळात मध्य रेल्वेने 12.57 दशलक्ष टन मालवाहतूक केली. जी 2020 मधील याच कालावधीतील 7.55 दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत 66.5 टक्क्यांनी जास्त आहे.



भुसावळ विभागात 0.95 दशलक्ष टन वाहतूक
मध्य रेल्वेतील 12.57 दशलक्ष टन माल वाहतुकीत मुंबई विभाग 2.83 दशलक्ष टन, भुसावळ विभाग 0.95 दशलक्ष टन, नागपूर विभाग 7.30 दशलक्ष टन, पुणे विभाग 0.29 दशलक्ष टन आणि सोलापूर विभाग 1.20 दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.

वेळेसह पैशांची बचत
रेल्वेतील मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वेत अनेक सूट-सवलतीही दिल्या जात आहेत. वेगवान मालवाहतूकीसाठी केलेल्या सुधारणेमुळे उद्योजकांंच्या पैशांची बचत होते. वर्षभरात मालवाहतूकीचा वेग जवळजवळ दुप्पट झालेला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !