यंदाही आषाढी वारी बसनेच : दहा पालखी सोहळ्यांना परवानगी -अजित पवार


पंढरपूर : यंदादेखील आषाढी वारी बस नेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला.

बसनेच यंदाही जाणार वारी
दहा मानाच्या पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थानाला एकुण 100 लोकांना तर इतर पालख्यांमध्ये 50 जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याच्या एकूण 60 लोकांना बसने पंढरपूर ला जाता येईल.वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बसने जाईल तर पूजा गेल्या वेळेप्रमाणे होईल व पूजेला पाच जणांना परवानगी असेल.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !