माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर मुंबईत उपचार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे आठवडाभरापासून रुग्णालयात असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबीयांच्या सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकलीचा फेरा लागला होता. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे तर एकनाथराव खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.




