अज्ञात कारणावरून 35 वर्षीय तरुणाचा खून
लातूर : अज्ञात कारणावरून 35 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना लातुरातील सद्गुरुनगरात मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारस घडली. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली. गोकुळ मंत्री असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत गोकुळ मंत्री हे आपल्या मोटारसायकलवरुन (एम.एच. 24 बी.ए. 4339) मंगळवारी तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडल्यानंतर सद्गुरुनगराजवळ रधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील परीसरात दोघांनी गोकुळ मंत्री यांच्या डोक्यात, पाठीत आणि शरिरावर कत्ती, चाकू, धारदार शस्त्राने सपासप वार केल्याने मंत्री यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी आपल्या कर्मचार्यांसह भेट देवून पंचनामा केला.