भुसावळ डीआरएम यांनी केली भुसावळ-खंडवा-ओंकारेश्वर रोड रेल्वे मार्गाची केली पाहणी
खासदार व लोकप्रतिनिधींसोबत बर्हाणपूर येथे रेल्वे विकासकामे आणि प्रवासी सुविधांचा घेतला आढावा
भुसावळ (मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026) : भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिकार्यांसह भुसावळ-खंडवा-ओंकारेश्वर रोड रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंगद्वारे पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी रेल्वे मार्गावरील ट्रॅक, रेल्वे मालमत्ता, पायाभूत सुविधा तसेच रेल्वे परिचालन आणि सुरक्षिततेशी संबंधित व्यवस्थांचा आढावा घेतला.
पायाभूत सुविधांची पाहणी
पाहणीदरम्यान बर्हाणपूर, खंडवा आणि ओंकारेश्वर रोड रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांची उपलब्धता तसेच पायाभूत सुविधांच्या स्थितीची समीक्षा करण्यात आली. यावेळी स्थानकांची स्वच्छता, प्रवासी सुविधांची उपलब्धता व गुणवत्ता, रेल्वे ट्रॅकची स्थिती तसेच सिग्नल आणि दूरसंचार (एस अॅण्ड टी) व्यवस्थांवर विशेष लक्ष देण्यात आले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी बर्हाणपूर येथे खंडवा आणि बर्हाणपूर लोकसभा मतदारसंघांतील रेल्वे सुविधांचा विस्तार, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीत प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, माल गोदामापर्यंत जाणार्या रस्त्याचा प्रश्न, तिसर्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे बांधकाम, बुर्हाणपूर येथे लूप लाइनची उभारणी तसेच चिंचाळा-शिवाजीनगर दरम्यान रोड अंडरपास (ठणइ) बांधण्यासह लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध रेल्वे विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित कामांची प्रगती, रेल्वे व रस्ते वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीला आमदार अर्चना चिटणीस, नेपानगर आमदार मंजू दादू, महापौर माधुरी पटेल, बर्हाणपूर महानगरपालिका सभापती अनिता यादव, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतर प्रवासी उपस्थित होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी भुसावळ-खंडवा-ओंकारेश्वर रोड रेल्वे मार्गाची केली पाहणी करीत खासदार व लोकप्रतिनिधींसोबत बुर्हाणपूर येथे रेल्वे विकासकामे आणि प्रवासी सुविधांचा घेतला आढावा
विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी वरिष्ठ शाखा अधिकार्यांसह भुसावळ-खंडवा-ओंकारेश्वर रोड रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंगद्वारे पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी रेल्वे मार्गावरील ट्रॅक, रेल्वे मालमत्ता, पायाभूत सुविधा तसेच रेल्वे परिचालन आणि सुरक्षिततेशी संबंधित व्यवस्थांचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान बर्हाणपूर, खंडवा आणि ओंकारेश्वर रोड रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधांची उपलब्धता तसेच पायाभूत सुविधांच्या स्थितीची समीक्षा करण्यात आली. यावेळी स्थानकांची स्वच्छता, प्रवासी सुविधांची उपलब्धता व गुणवत्ता, रेल्वे ट्रॅकची स्थिती तसेच सिग्नल आणि दूरसंचार (एस अँड टी) व्यवस्थांवर विशेष लक्ष देण्यात आले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी बर्हाणपूर येथे खंडवा आणि बर्हाणपूर लोकसभा मतदारसंघांतील रेल्वे सुविधांचा विस्तार, प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत बैठक घेतली.
या बैठकीत प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, माल गोदामापर्यंत जाणार्या रस्त्याचा प्रश्न, तिसर्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेचे बांधकाम, बुर्हाणपूर येथे लूप लाइनची उभारणी तसेच चिंचाळा-शिवाजीनगर दरम्यान रोड अंडरपास बांधण्यासह लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध रेल्वे विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित कामांची प्रगती, रेल्वे व रस्ते वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीला बुर्हाणपूर माननीय आमदार श्रीमती अर्चना चिटणीस, नेपानगर माननीय आमदार श्रीमती मंजू दादू, महापौर श्रीमती माधुरी पटेल, बुर्हाणपूर महानगरपालिका सभापती श्रीमती अनीता यादव, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी तसेच इतर प्रवासी उपस्थित होते.
