पोलिस असल्याचे सांगत सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
नाशिक : मंदिराकडून घराकडे येत असलेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगत हातातील बांगड्या काढून ठेवा म्हणून बांगड्या काढताच चोरट्यांनी त्या घेवून पलायन केले. हिरावाडी रोडवर मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटा घडली. हिरावाडी रोड, ओमनगर खोडीयार निवास येथे राहणार्या सुशिला सुरेश गुजराती या मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता मंदिरातून घरी येत असताना अज्ञातांनी त्यांना ठगवत हातातील बांगड्या लंपास केल्या.