जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका : सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचे दुर्दैवी निधन


सोलापूर : जीम मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने सोलापूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले (56) यांचे निधन झाले. एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त होत आहे. सुहास भोसले हे विभाग 1 एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते, जेलरोड पोलीस ठाण्याच्या बाजुला हे कार्यालय होते. 1 एप्रिल 2021 रोजी ते अमरावतीहून सोलापूरात जॉईन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !