धक्कादायक : अल्पवयीन मुलाने मद्यपी पित्याचा केला खून
राजगुरूनगर : वडील दारू पिऊन शिवीगाळ करीत मारहाण करीत असलेल्या संतप्त झालेल्या 16 वर्षीय मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी घण टाकून त्यांचा खून केला. ही घटना खेड तालुक्यातील पुर्व भागातील दावडी येथे घडली. या घटनेत संतोष वाघिरे (43, रा. कान्हुरकरमळा, चिंचोशी रोड, खेड) यांचा मृत्यू झाला. मंगळवार, 10 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत खेड पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत मोठा भाऊ आदिनाथ संतोश वाघिरे, (20, कान्हुरमळा, चिंचोशी रोड, दावडी, खेड) यांनी लहाण भावाच्या विरोधात वडीलाच्या खुनाची फिर्याद दिली आहे. घटनास्थळी खेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार सचिन गिलबिले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल लाड करीत आहेत.