ब्रेकींग न्यूज : हॉटेल्स, रेस्टारंट व शॉपींग मॉल आता रात्री दहा वाजेपर्यंत राहणार खुले


आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती : राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीय निर्णय : व्यावसायीकांना मोठा दिलासा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यावसायीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर दिली. या निर्णयामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

…तर कडक लॉकडाऊन
राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रीक टनच्या वर पोहोचे तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवागनी देण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितलं.

मंगल कार्यालांसाठी मर्यादा वाढवली
लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर 200 माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा 100 माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय देखील 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे, असं टोपे यांनी सागितलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !