गर्दी जमवल्याचा ठपका : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाणांसह जमावाविरोधात गुन्हा


चाळीसगाव : बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी मोर्चा काढून गर्दी जमविल्याप्रकरणी चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 100 ते 125 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बैलगाडी शर्यतीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी चाळीसगाव येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. यात आमदार चव्हाण हे ही सहभागी झाले. यात फिजिकल डिस्टनसिंगचे पालन न करणे, मास्क न लावणे तसेच जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण, बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष दीपक काशिनाथ गायकवाड, भावेश मुकुंद कोठावदे, उत्तम भिकन पाटील, सौरभ अशोक पाटील,सोनू रमेश गायकवाड, अहमदखान युसुफखान, गौतम दीपक सोनवणे, प्रवीण मराठे, दिलीप नथ्थू अहिरे, नितीन भगवान जाधव, सोमनाथ निंबा राजपूत, संतोष गणपत आगोणे, दीपक गांगुर्डे यांच्यासह 100 ते 125 आंदोलकांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश पाटील करीत आहेत.




 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !