भाजपा खासदाराच्या सेक्स व्हिडिओमुळे गुजरातमधील राजकारणात खळबळ


अहमदाबाद : एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली असून हा व्हिडिओ गुजरातमधील भाजपा खासदाराचा असल्याचा आरोप होत आहे. या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने 15 ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला असतानाच त्यापूर्वी हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे. खासदार परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्या मुलाने पोलिसांमध्ये याप्रकरणी मधाभाई पटेल आणि मुकेश राजपूत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे.

फोटो एडिट केल्याचा दावा
या व्हिडीओबाबत बनासकांठा येथील आम आदमी पक्षाचे नेते मधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कुणाचाही फोटो दिसत नव्हता. मात्र मधाभाई यांनी ते भाजपाच्या या नेत्याचा संपूर्ण व्हिडीओ 15 ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुकवर शेअर करणार असल्याचा दावा केला होता.मात्र ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर भाजपाचे नेते आणि खासदार परबत पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये कधीही कुठलेही वाईट काम केलेले नाही. कदाचित माझे फोटो एडिट करून मॉर्फ करण्यात आले असावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !