जिल्हा दूध संघ अध्यक्षा मंदाताई खडसे यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स


मुंबई  : भोसरीतील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आधीच्या समन्सप्रसंगी खडसे यांनी मुदत मागून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भोसरी भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता शिवाय अलीकडेच त्यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली आहे. याआधी एकनाथराव खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दुसर्‍या चौकशीच्या दरम्यान खडसे यांनी पूर्ण सहकार्य करत हव्या त्या वेळेस गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात 5 जुलै पासून ईडीच्या अटकेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !