मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
मुक्ताईनगर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द काढणार्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला प्रवर्तन चौकात शिवसैनिकांनी जोडे मारत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंगळवारी दहन केले. प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, युवा सेना प्रमुख पंकज राणे, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, नवनीत पाटील, जीवराम कोळी, भागवत कोळी, शिवाजी पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, संतोष उर्फ बबलू कोळी, मुकेश वानखेडे, पियुष महाजन, नितेश पाटील, दीपक खुळे, आकाश सापधरे, विठ्ठल तळेले, नरेंद्र पाटील, नितेश पाटील, संदीप ढिवरे, राजू बगाले, अशोक कोळी, दीपक वाघ, संचालाल वाघ, सचिन पाटील, कृष्णा पाटील, वैभव कोल्हे, अर्जुन सांगळकर, कल्पेश पाटील, गजानन पंढरी पाटील, सुनील गवते, विशाल भोजने यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

