बोदवडमध्ये शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे
बोदवड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसैनिकांनी जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी काही वेळ रस्ता रोखल्याने वाहतूक ठप्प झाली. तहसील प्रशासनाला निवेदन देवून राणेंवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी बोदवड शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, बोदवड शहरप्रमुख हर्षल बडगुजर, अल्पसंख्यांक उपसंघटक कलिमभाई, शेख, राजेश नाणवाणी, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक आनंदा पाटील, दीपक माळी, आतीश सारवान, विभागप्रमुख गोपाळ पाटील, जितेंद्र पाटील, नईम खान, बंटी पाटील, गजानन भोंडेकर, अजय पाटील, मोहन पाटील, गजानन पाटील, निलेश माळी, अमोल पाटील, सचिन भोई, योगेश भोई, भूषण भोई व शिवसैनिक उपस्थित होते.

