सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन यांच्या मृत्यूची चौकशी अद्याप अपूर्ण : नारायण राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा


रत्नागिरी : शिवसेनेसोबत मी 39 वर्षे काम केले असून अनेक जुनी प्रकरणं मला माहीत आहेत. रमेश मोरेंची हत्या कशी झाली. आपल्याच आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. सगळी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू, अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेला इशारा दिला असून दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशीदेखील अद्याप पूर्ण झालेली नाही, असेदेखील राणे म्हणाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी रंगलेल्या अटक नाट्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

अटक करून काय पराक्रम केला ?
केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. एखाद्या दरोडेखोराप्रमाणे मला अटक करण्यात आली. मी शिवसेनेसोबत थोडीथोडकी नव्हे, 39 वर्षे होतो. त्यामुळे माझ्याकडे बराच मसाला आहे, असं सूचक विधान राणेंनी केलं. ते जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरीत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास पर्ज्ञीी वर्षे झाली आहेत. या 2 वर्षांत कोकणाला काय दिलं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. दादागिरी करू नका, माझ्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा त्यांनी दिला. आपल्याला विधायक काम करायची आहेत. आम्ही घरात बसून राहत नाही. लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी संवाद साधून कामं करतो, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता शरसंधान साधलं.
शिवसेना कोकणात औषधालादेखील सापडणार नाही, असं राणे म्हणाले.




 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !