आव्हाणेच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील गंगाधर योगराज पाटील (40) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. बांधकाम ठेकेदारीचे काम करून उदरनिर्वाह करणार्या गंगाधर पाटील यांना गेल्या दोन वर्षांपासून एका दुर्धर आजाराने ग्रासल्याने त्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मयताच्या पश्चात मोठा भाऊ विलास, दोन विवाहित बहिनी असा परीवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल फेगडे करीत आहे.

